नमस्कार,
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित राखणे, अत्यंत आवश्यक बनले आहे. यासाठी आपण सदैव हसतमुख, उत्साही आणि कार्यतत्पर राहणे आवश्यक आहे. यासाठी, आपण आपली दिनचर्या योग्य राखणे आवश्यक आहे. योग्य आहार, प्राणायाम, योगासने, ध्यान याद्वारे आपण, आपले जीवन नक्कीच समृद्ध करू शकतो. या सर्व गोष्टींच्या प्रभावी मार्गदर्शनासाठी "आत्मदर्शन शिबीर", आयोजित केले जाते.
या शिबिरासंबंधी माहिती या संकेतस्थळावर दिली आहे. तसेच पूर्वी ज्यांनी "आत्मदर्शन शिबीर" केले आहे, त्या साधकांचे अनुभव दिले आहेत. ते पाहून आणि माहिती वाचून आपला प्रवेश आपण आजच निश्चित करावा... अधिक माहितीसाठी, स्वयंसेवकांशी संपर्क करावा.
आत्मदर्शन शिबीर हे सुयोग्य रीतीने नियोजित, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त असे शिबीर आहे. या शिबिरामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती होऊन, जीवन आनंदमय होते.
या शिबिरात, विविध व्यायाम, संतुलित आहार, योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, खेळ आणि भारतीय गुरुपरंपरेतील मौलिक ज्ञान हसत-खेळत व अनुभवातून दिले जाते. यातून, स्वतःची प्रगती स्वतःच कशी साधावी याची गुरुकिल्ली मिळते आणि प्रत्येकामध्ये परमेश्वर पाहण्याची दृष्टी मिळते.
नेहमी हसतमुख, उत्साही, कार्यतत्पर, एकाग्रचित्त राहण्यासाठी शरीर, मन, बुद्धी यांचे संतुलन राखण्याबद्दलचे मार्गदर्शन हसत खेळत लाभते.
शिबीरामध्ये विविध व्यायाम, संतुलित आहार, योगासने, प्राणायाम, ध्यान धारणा, विविध खेळ आणि समाधीचे अत्यंत शास्त्रशुद्ध ज्ञान दिले जाते.
शिबीराव्दारे कार्याचा दर्जा आणि क्षमता यामध्ये आश्चर्यकारक बदल घडून येतो.
वजन कमी होणे, व्यसनमुक्ती, एकाग्रता, स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता वाढते.
शारीरिक, मानसिक व्याधी निघून जातात. डायबेटीस, ब्लडप्रेशर, पाठदुखी, अस्थमा, एसिडिटी, लठ्ठपणा, त्वचाविकार अशा अनेकातून सुटका होते.
आपली उन्नती आपले कार्यक्षेत्र, कुटुंब, व्यवसाय, नोकरी, सामाजिक कार्यामध्ये प्रकर्षाने समृद्धी रुपाने दिसते.
विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, बुद्धीमत्ता वाढीने अभ्यासामध्ये लक्षणीय प्रगती दिसून येते. आळस, निरुत्साह, काळजी निघून जाऊन अत्यंत उत्साह आणि आत्मविश्वास प्राप्त होतो.
आहार, योगासने, प्राणायाम, ध्यान याद्वारे शंभर वर्षे जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते.
मंत्रोच्चार, अष्टांगयोग, पंचकोष शुद्धी, दिनचर्या, ऋतुचर्या, सत्संग, संगीतनाट्य व जीवनातील सर्व जाणीवांना स्पर्श होतो.
खेळ, मनोरंजन, श्रवण, मनन, निधिध्यानातुन परमार्थ दर्शन घडते.
स्वत:ची प्रगती स्वत:च कशी करावी याची गुरुकिल्ली सापडते. प्रत्येकातील परमेश्वर पाहण्याची दृष्टी प्राप्त होते.
शिबीरातील शेवटच्या ३ दिवसाच्या निसर्गसहलीतून हसत खेळत, गुरुशिष्य परंपरेतून, ज्ञानानुभव मिळण्याची सुवर्णसंधी.
आत्मदर्शन शिबीर हे बारा (१२) दिवसांचे असते.
पहिले नऊ दिवस शिबीर फक्त सकाळी ६.०० ते ८.३० पर्यंतच असते.
शेवटचे तीन दिवस (शुक्र,शनी, व रविवार) निसर्ग सहल असते, ज्यामध्ये उच्च अध्यात्मिक ज्ञान गुरु परंपरेतून दिले जाते.
हे शिबीर, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगाव या ठिकाणी आयोजित केले जाते. इतर ठिकाणीही आवश्यकतेप्रमाणे आयोजित केले जाऊ शकते.
आतापर्यंत २८० आत्मदर्शन शिबिरे झाली आहेत, आणि हजारो साधकांनी आपले जीवन आनंदी आणि उत्साही केले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शेतकरी, वकील, शिक्षक, प्रोफेसर्स, आर्किटेक्ट, तसेच, विद्यार्थी-विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरदार, दुकानदार, व्यावसायिक यांनी शिबीर केले आहे. त्यातील काही साधकांच्या प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत.
या प्रतिक्रिया पाहून, आपणांसही हे शिबीर करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. या शिबिरातील प्रवेश म्हणजे, आपले जीवन सदैव आनंदी करण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल असेल..