सांगलीतील २८६ वे नियोजित शिबीर दि. बुधवार दि. १९ नोव्हेंबर २०२५ पासून रविवार, ३० नोव्हेंबर २०२५पर्यंत आहे.
शिबिराचे स्थळ :
विश्रामबाग रोटरी क्लब हॉल,
'क्रांती भेळ' च्या समोर,
विश्रामबाग, सांगली.
तारीख आणि वेळ:
दि. १९ नोव्हेंबर २७ नोव्हेंबर २०२५,
सकाळी ६.०० ते ८.३० पर्यंत
२८-३० नोव्हेंबर (शुक्र,शनी, व रविवार) पूर्णवेळ
पूर्वी शिबीर केलेल्या साधकांना अतिशय छान अनुभव आले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाले आहेत. अनुभव वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
🌿 आत्मदर्शन शिबिर – उपयुक्त माहिती 🌿
प्रिय साधकहो,
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संतुलित राखणे अत्यंत आवश्यक बनले आहे. यासाठी योग्य आहार, प्राणायाम, योगासने, ध्यान आणि भारतीय परंपरेचे अध्यात्मिक ज्ञान याद्वारे आपण आपले जीवन नक्कीच समृद्ध करू शकतो.
या सर्व गोष्टींच्या प्रभावी मार्गदर्शनासाठी, आत्मदर्शन शिबिर आयोजित केले जाते. हे शिबिर तरुण मुले, मुली, गृहिणी, व्यावसायिक, नोकरदार इ. सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त आहे. हे शिबिर एकूण १२ दिवसांचे आहे. त्यातील पहिले ९ दिवस सकाळी ६ ते ८.३० आणि नंतरचे ३ दिवस (शुक्र, शनी, रविवार) पूर्णवेळ (निसर्गरम्य सहल) असते.
आत्मदर्शन शिबिराचा सर्व खर्च सहभागींच्या योगदानातून (काँट्रीब्युशन द्वारे) भागवला जातो. हा खर्च केवळ शिबिरातील सहभागींसाठीच्या सोयींसाठीच वापरला जातो. त्यामुळे हा खर्च नसून आपले काँट्रीब्युशन आपल्यासाठीच वापरले जाते.
साधकांची संख्या वाढली तर सहभागमूल्य कमी होऊ शकते.
म्हणून तुम्हीच नाही तर तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांनाही घेऊन या.
यामध्ये समाविष्ट आहे –
९ दिवस रोज कषाय व सात्विक आहार (रोज वेगळा मेनू) 🍲
कोल्हापूरजवळील निसर्गोपचार केंद्रात जाण्या-येण्याची private bus व्यवस्था 🚌
तिथे ३ दिवसांचे राहणे, नाश्ता, जेवण इत्यादी सुविधा 🏡
आहार पूर्णतः सात्विक असून त्याचा तपशील पाठवलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
शिबीरानंतरच्या कौटुंबिक स्नेहमेळाव्याचा खर्च.
गुरुजींची सर्व सत्रे (आध्यात्मिक, personality development इ.) पूर्णतः नि:शुल्क आहेत.
जो खर्च आहे तो फक्त आपल्याच प्रवास-राहणी-जेवणाचाच आहे.
सर्व स्वयंसेवक आपली सेवा स्वखर्चाने व निःस्वार्थ भावाने देतात.
सकाळी ५.३० वाजता येऊन सर्वांसाठी कषाय, नाश्ता तयार करतात,
दुपारी दुसऱ्या दिवसाची तयारी करतात. 🙏
गुरुजी दररोज पहाटे ४ वाजता कोल्हापूरहून निघतात आणि ५.४५ ला शिबिरस्थळी उपस्थित असतात.
ते सिव्हिल इंजिनियर असून, १२ वर्षे हिमालयात तप केलेले आहेत.
हा खर्च नसून स्वतःला ओळखण्याची, वाढवण्याची अमूल्य संधी आहे.
आपले काँट्रीब्युशन आपल्यासाठीच वापरायचे आहे.
शिबिराचा हिशोब पूर्णपणे पारदर्शक असून, सहभागी साधकच त्याचे लेखाजोखा ठेवतात.
🌼 ही संधी दवडू नका!
अशा साधक-केंद्री, नि:स्वार्थ वातावरणात गुरुजींकडून आत्मदर्शनाचा अनुभव घेणे हे खरोखर दुर्मिळ भाग्य आहे. 🌸
आजच संपर्क साधा आणि आपला प्रवेश निश्चित करा —
आपले पुढील आयुष्य समाधानात जाईल याची खात्री करा!
तुम्हीच नाही तर तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांनाही घेऊन या.
(कोणतीही शंका असल्यास पहिल्या दिवशी शिबीर अटेंड करून गुरुजींना आपल्या शंका विचारू शकता.)
📅 सांगलीतील शिबीर प्रारंभ: १९ नोव्हेंबर २०२५
📍 स्थळ: विश्रामबाग रोटरी हॉल, क्रांती भेळ समोर, विश्रामबाग, सांगली
🕕 वेळ: सकाळी ६.०० ते ८.३०
🔗 अधिक माहितीसाठी: atmdarshanshibir.org