मित्रांनो,
आतापर्यंत २८५ आत्मदर्शन शिबिरे झाली आहेत, आणि हजारो साधकांनी आपले जीवन आनंदी आणि उत्साही केले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शेतकरी, वकील, शिक्षक, प्रोफेसर्स, आर्किटेक्ट, तसेच, विद्यार्थी-विद्यार्थिनी, गृहिणी, नोकरदार, दुकानदार, व्यावसायिक यांनी शिबीर केले आहे. त्यातील काही साधकांच्या प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत.
या प्रतिक्रिया पाहून, आपणांसही हे शिबीर करण्याची प्रेरणा नक्की मिळेल. या शिबिरातील प्रवेश म्हणजे, आपले जीवन सदैव आनंदी करण्यासाठीचे एक महत्त्वाचे पाऊल असेल..
डॉ. निलेश शहा
ओम गुरुदेव !!!
मी डॉ. निलेश शहा, वय ५३, राहणार सांगली .
व्यवसाय: नेत्ररोग तज्ञ म्हणून सांगलीमध्ये गेली २३ वर्षे प्रॅक्टिस करत आहे.
ऑगस्ट २००७ मध्ये मी आत्मदर्शन हे शिबिर केले. पूर्वी केलेल्या वेगवेगळ्या शिबिरांशी याची तुलना करता, मला हे एक "परिपूर्ण असे शिबिर" अनुभवास आले. यामध्ये शारीरिक स्वास्थ, मानसिक स्वास्थ आणि आध्यात्मिक ज्ञान यांची माहिती, अगदी सहज सोप्या भाषेत, प्रात्यक्षिकासहित सद्गुरु श्री संजीव कुलकर्णी गुरुजी आपणास शिकवतात.
पूरक व्यायाम, योगा, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान, वेगवेगळे खेळ या शिबिर मध्ये शिकवले जातात. आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव या शिबिरातून नक्कीच मिळतो. १०० वर्षे निरोगी व आनंदी जीवन जगण्याची कला म्हणजेच आत्मदर्शन शिबिर. गुरु शिष्य परंपरे तून अध्यात्मिक ज्ञान खूप सोप्या भाषेत अगदी कमी कालावधीत आपणास गुरुजी देतात.
या शिबिरामुळे मला व्यायामाची आवड निर्माण झाली.
१. अगदी लहान मुलांपासून ते मी मोठ्या व्यक्ती सोबत आनंदाने खेळू लागलो आहे.
२. सर्व नातेवाईकांसोबत आनंदाने प्रेमाने राहत आहे. कोणाशीही तक्रार करत नाही, त्यामुळे कौटुंबिक संबंध खूप छान आहेत. काही मदत हवी असेल तर सर्व कुटुंबीय लगेच हजर असतात.
३. सद्गुरु कृपेने व्यवसाय कोणतीही जाहिरातबाजी न करता गुरुजींनी शिकवलेल्या मार्गाने सुरळीत सुरू आहे.
४. आर्थिक अडचण कधीच जाणवली नाही.
५. प्रत्येक शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करत असल्यामुळे वेगवेगळ्या कुटुंबाशी अगदी जवळीक निर्माण झाली आहे.
त्यामुळे कोणतेही काम सहजतेने होत आहे.
६. शिबिरातून मिळालेल्या अध्यात्मिक ज्ञानामुळे, वेगवेगळ्या मंत्रोच्चारांमुळे सदैव एक संरक्षण कवच आपल्या भोवती निर्माण झाले आहे याची जाणीव होऊन वाईट शक्तीपासून रक्षण आपोआपच होत आहे. अहंभावाचा नाश झाला आहे.
७. सद्गुरु कृपेमुळे अनेक विद्वान, ज्ञानी, संत, सद्गुरू यांचा आशीर्वाद सदैव भेटत आहे.
हे शिबिर लवकरात लवकर एकदा तरी अनुभवावे अशी सद्बुद्धी ईश्वर आपणास देवो ही सद्गुरू चरणी प्रार्थना.!!!!
ओम गुरुदेव !!!
डॉ. विद्याधर धर्माधिकारी
ॐ गरुदेव...
माझे नाव डॉ. विद्याधर धर्माधिकारी, वय ६१ वर्षे, विश्रामबाग, सांगली. मी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये १९८९ पासून २०२२ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स पदवी आणि पदव्युत्तर विभागात प्राध्यापक होतो.
आत्मदर्शनचे २७५ वे शिबीर मी पूर्ण केले. शिबिराचा अनुभव अवर्णांनीय असा होता. सर्वाभूती परमेश्वर याचा प्रत्यक्ष अनुभव आला. अत्यंत खेळीमेळीने उत्साहाने गुरुजी आपल्याला आत्मज्ञान सोप्या भाषेत देतात. निसर्गसान्निध्यात राहून गुरु-परंपरेतुन आत्मज्ञान प्राप्त झाले.
आत्मदर्शन शिबिरामुळे,
१. माझी दिनचर्या नीट झाली.
२. सात्विक आहारामुळे आणि योग-प्राणायामामुळे आरोग्य उत्तम झाले.
३. वजन ६५ वरून ६०.५ किलो झाले.
४. पाठदुखी गेली. फ्रोझन शोल्डर चा प्रॉब्लेम पूर्ण गेला.
५. जानेवारी २०२५ मध्ये मी आणि माझी पत्नी 'गिरनार पर्वत' (१५००० पायऱ्या) चढून आलो. दम लागला नाही किंवा इतर त्रास झाला नाही.
६. शिबिरामुळे कौटुंबिक वातावरण गोकुळासारखे अतिशय आनंदी झाले.
७. शिबिरात भेटलेल्या उत्तम आणि गुणी मित्रांमुळे आमचे कुटुंब अधिक मोठे झाले.
८. सामाजिक कार्याची गोडी वाढली. शिबिराच्या नियोजनातही भाग घेता आला.
एकंदरीत नवजीवन मिळाल्याचा अनुभव आला.
आपणही हे शिबीर पूर्ण करून जीवनाचे सार्थक करून घ्यावे हि विनंती. ॐ गुरुदेव..
ओम गुरुदेव..
नाव - दीपक कुंभार, मार्केट यार्ड, सांगली. व्यवसाय.
शिबिर क्रमांक -२७५
१. शिबिर केल्यापासून नियमित योगासने , व्यायाम होतो.
२. दिवसाचा आहाराचे प्लॅनिंग बनलेले आहे. सात्विक आहार घेण्याची सवय लागली.
३. शरीराचे वजन नियंत्रित होऊन पाच किलो वजन घटले.
४. शिबिर केल्यापासून ध्यान धरणेमुळे मानसिक स्वास्थ व बौद्धिक स्वास्थ सुधारले आहे.
५. कुटुंब व मित्रपरिवार यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
६. नियमित मंत्रोच्चार करण्याची सवय लागली.
७. सतत आनंदी आणि आनंद स्वरूप कसे रहावे हे कळाले.
८. अध्यात्मा विषयी आवड निर्माण झाली.
९. शंभर वर्ष आयुष्य निरोगी कशी जगावे ही कला अवगत झाली.
१०. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्वास्थ आणि कौटुंबिक स्वास्थ्य, आणि अध्यात्मिक प्रगती झालेली आहे.
११. गुरुतत्त्वाचे पालन केल्यामुळे आयुष्यात नक्की यशस्वी होऊ हा आत्मविश्वास जागृत झाला.
आत्मदर्शन शिबिरामुळे एक नवीन मित्र परिवार भेटलेला आहे. शिबिरा दरम्यान गुरुजींनी दिलेले ज्ञान हे सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. गुरुजी व गुरुचरणी कायमसेवा घडत राहो ही प्रार्थना..
धन्यवाद .. ओम गुरुदेव🙏
'आत्मदर्शन शिबिर' - एक आनंदानुभव !
एरवी प्रयत्न करूनही प्राप्त न होणारी एखादी गोष्ट, ध्यानीमनी नसताना अनपेक्षितपणे मिळाली तर तो आनंद अवर्णनीय असतो. माझा 'आत्मदर्शन' शिबिराचा अनुभव हा असाच एक आनंदानुभव आहे असेच मला वाटते.
मी सौ. मंगला करंबळेकर सांगली. वय-७२ वर्षे. लग्नानंतरचं एम.ए.चं शिक्षण, पुढे १५ वर्षे नोकरी आणि नंतर माझ्या आवडीमुळे हळूहळू आकाराला आलेला आणि पुढे गांवभाग, सांगलीमधे स्वतःच्या मालकीचं ऑफीस थाटण्याइतका प्रगतीपथावर गेलेला माझा 'गुंतवणूक सल्लागार' हा व्यवसाय !
गृहिणीपद सांभाळून मी हे सगळं करत आले, याचा अभिमान आणि आनंद होता हे खरे, पण या सगळ्यांत हळूहळू गुंतून रहात जाताना बरंच कांही दुर्लक्षित राहून, हातातून निसटून गेलंय याची बोचरी जाणिव मला झाली, ती या आत्मदर्शन शिबिरामुळे ! आदरणीय गुरुवर्य श्री. संजीव कुलकर्णी यांना त्यासाठी मी धन्यवाद देते.
मी आत्मदर्शन च्या २६८ व्या शिबिराची साधक. माझी मैत्रिण वैशाली डफळापूरकर हिच्यामुळे मी हे शिबिर केले. हा निर्णय घेताना तेव्हा शिबिर म्हणजे काय असते याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. शिबिर म्हणजे वेळ चांगला जावा म्हणून खेळ, गप्पा, गाणी असा काहीतरी करमणुकीचा प्रकार असेल असेच मला वाटले होते. त्यामुळे मनात त्याबद्दलची उत्सुकता किंवा दडपण कांहीच नव्हते. खरं सांगायचं तर माझ्या व्यवसायाचे व्याप माझा नातू सांभाळत असल्यामुळे मी मोकळी असल्याने, फक्त आता भरपूर वेळ आहे तेव्हा कांहीतरी करूया, म्हणून मी अक्षरशः निरपेक्ष भावनेनेच या शिबिराला सुरुवात करणे आणि आज 'शिबिराचे ते ११ दिवस हा माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाक आणि समाधानाचा काळ आहे' हीच भावना माझ्या मनात असणे मला खूप महत्त्वाचे वाटते.
शिबिरामुळे मला झालेले फायदे आणि शिकता आलेल्या गोकरी थोडक्यांत खानिलप्रमाणे
१. ध्यान धारणा, मंत्रोच्चार, विविध खेळ गुरुजी स्वतः करुन घेत. त्याचे महत्त्व व आवश्यकता स्वानुभवातूनच मनोमन आपोआप पटली.
२. स्टेजवर सर्वांसमोर उभं राहून बोलणं मला कधीच जमायचं नाही. त्याचं दडपण आणि भिती वाटे. गुरुजींच्या आग्रहामुळे थोड्या प्रमाणात का होईना ते धाडस करण्याचा आत्मविश्वास माला मिळाला.
३. माझा स्वभाव कांहीसा चिडचिडा, तापट. लहान सहान गोष्टीचाही मला चटकन् राग येई. रागाच्या भरांत बोललेलं ऐकणाऱ्याला त्रासदायक ठरे. तसंच मलाही त्रास देत राही. पण 'स्वभावाला औषध नाही' असं म्हणून मी तेच गृहीत धरलं होतं. हे शिबिर माझ्या स्वभावातला दोष दूर करणारं औषध ठरलंय. माझं मन जाणवेल इतक्या प्रमाणात शांत झालंय. प्रयलपूर्वक विचार करून व्यक्त होण्याची सवय मला लागली. माझ्या परिचितांनाही माझ्यातला हा सकारात्मक बदल जाणवला, त्यांनी तसे बोलूनही दाखवले, तेव्हा मला खूप समाधान वाटले होते.
हे अशाप्रकारचे शिबिर आपल्यातरुणवयात करायला मिळाले असते तर...? ही खंत मनात नसली, तरी रुखरुख मात्र नक्कीच आहे.
म्हणूनच आजच्या तरुण पिढीने तर आवर्जून या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक आकार द्यावा असे आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते.
सौ. मंगला करंबळकर, सांगली
(मोबा-९८२३१७६१५४)
🙏🏻 मी विजय बापू पोतदार, राहणार कसबा बावडा, कोल्हापूर. मी २५४ वे शिबीर व शांतीपर्व केले आहे.
योग आल्या शिवाय कोणतेही कार्य घडत नाही. नोकरीतून निवृत्त झालेनंतर आमचे जावई अविनाश मुखरे व आमचे निवृत्त पोलीस सोसायटी चे माजी अध्यक्ष कै. श्री चव्हाण साहेब यांचे मुळे आत्मदर्शन शिबीर करण्याचा योग आला.
शिबीर करायला उशीर झाले मुळे मनाला खंत वाटते.
शिबीर केल्या मुळे व्यायाम, टोनींग, योगा, प्राणायाम शिकलो सध्या हे सगळी कडे शिकायला मिळतेच पण जे गुरुदेव आपल्या नेहमीच्या वागण्यात बोलण्यात बदल घडवून आणतात ते आपले खरे गुरुदेव होय.
शिबीर केल्या नंतर बरेच समज-गैरसमज दूर झाले. वर्णन करणे करिता शब्दाचे भांडार कमी पडते. आमचे गुरुदेव असे आहेत की हसत मुखाने सर्व साधकांचे नमस्कार करुन स्वागत करतात. दर गुरुवारी आत्मदर्शन देवालयात सत्संग असतो, खूप साधू संत सन्याशी विद्वान डॉक्टर गायक यांचे प्रवचन रूपात मार्गदर्शन मिळते. मी जास्ती जास्त सत्संगाला हजर राहण्याचा प्रयत्न करतो.
थोडक्यात शिबीरा मुळे माझ्या मध्ये अमूलाग्र बदल झाला आहे.
शिबिराचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा मिळावा आणि शिबीर करावे विनंती करून येथेच थांबतो.
गुरुविना कोण दाखवील वाट?
आपला गुरुबंधू साधक,
विजय पोतदार, कोल्हापूर.
ओम गुरुदेव
ॐ गुरुदेव..
मी सौ. स्मिता प्रकाश नवलाई, वय ३८, चांदणी चौक, सांगली.
मी 'आत्मदर्शन शिबिर'278 ची साधक आहे.
मला या शिबिरातून खूप अविस्मरणीय असे अनुभव मिळाले.
'आत्म' म्हणजे 'मी' स्वतः . प्रथम आपण जीवन जगत असताना स्वतःकडे पाहिले पाहिजे. हे मी प्रथम शिकले. मी म्हणजेच आनंद ,चैतन्य आणि चेतना याची जाणीव झाली.
या शिबिराला जाऊन पुनर्जन्म झाला की काय असे वाटू लागले आहे. कितीही वाईट खडतर प्रसंग आले तरी आपण आनंदीच राहायचं हे बोधामृत गुरुजींनी दिलेलं नेहमी लक्षात राहतं.
शिबिरात गेल्यामुळे,
१. लवकर उठण्याची आणि योगासन व प्राणायाम करण्याची सवय लागली.
२. रागावर कंट्रोल करायला शिकले.
३. भाषण कौशल्य आणि स्टेज डेरिंग खूप सुधारले.
४. कोणाकडूनही अपेक्षा करायची नाही हे शिकले.
५. शिबिर केल्यामुळे सात्विक आहार घेण्याची सवय लागली, मांसाहार पूर्ण बंद केला.
६. वजन सहा ते सात किलो कमी झाले.
७. जेवण करत असताना घरातील सर्वांनाच मंत्रोच्चार करण्याची सवय लागली.
८. पाठ दुखीचा त्रास कमी झाला.
९. प्राणायाम केल्यामुळे जिना चढत असताना धाप लागायची कमी झाली. लिफ्ट चा वापर बंद करून जिना चा वापर चालू केला.
१०. कौटुंबिक वातावरण सुधारले.
११. सामाजिक कार्याची गोडी वाढली.
ॐ गुरुदेव.. सर्वांना नमस्कार..
माझे नाव रोहन जोतिराम पाटील, रा. भुयेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर.
आत्मदर्शन शिबीर मध्ये यायच्या आधी मी राक्षसी वृत्तीचा होतो. सतत शिव्या तोंडात. सहज बोलताना देखील तोंडात शिव्या यायच्या. सतत मांसाहार असायचा. सतत घमेंडी, जणू काही मी म्हणजे छत्रपतीच. मी म्हणेन तेच खरे असा माझा स्वभाव होता. मी कोणालाही समजून घेत नव्हतो.
पण आत्मदर्शन शिबीर केल्यापासून माझ्यात खूप मोठा बदल झाला.
१. माझ्या शिव्या पूर्ण पणे बंद झाल्या.
२. मांसाहार पूर्णपणे बंद केला आहे.
३. शिबीर केले पासून आपल्या इंद्रियांवर नियंत्रण आले आहे.
४. योगा, प्राणायम, ह्यामुळे माझे 7 किलो वजन कमी झाले आहे.
असे भरपूर बदल झाले आहेत. आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्याला एक अनमोल कलाटणी देणारा मला गुरु मिळाला आहे.
पुन्हा सर्वांना नमस्कार.. ॐ गुरुदेव..
ॐ गुरुदेव..
मी सौ.प्रियांका भूषण गारे, वय ३५, लक्ष्मी मंदिर, कुपवाड रोड, सांगली.
मी आत्मदर्शन शिबीर २७८ ची साधक आहे.
मला या शिबिरातून खूप छान अनुभव मिळाले.
१. "मी कोण आहे?" याची मला जाणीव झाली.
२. वजन कमी झाले.
३. पित्ताचा त्रास कमी झाला.
४. स्टेज डेअरिंग आले.
५. दिवसभर कितीही कामे झाली तरी उत्साह टिकून राहतो.
६. चिडचिडेपणा कमी झाला.
ओम गुरुदेव..
मी मकरंद पतंगे, सांगली. २७८ आत्मदर्शन शिबिराचा साधक.
मी शिबिरात सहभागी होण्यापूर्वी मला फार राग येत होता. विनाकारण चिडचिड होत होती. निरुत्साही झालो होतो. नकारात्मक विचार घोळत होते. माझे वजन वाढले होते. मी कौटुंबिक कार्यक्रमात फारसा सहभागी होत नव्हतो.
शिबिरात सहभागनंतर माझी life style पूर्णपणे बदलून गेली.
१. सकाळी साडे चार वाजता उठून थंड पाण्याने अंघोळीनंतर योगासने व प्राणायाम करतो. त्यानंतर इतर व्यायाम व फिरणे होते.
२. आता माझे वजन 10 ते 12 किलो कमी झाले आहे.
३. चिडचिडपणा पूर्णपणे बंद झाला आहे. राग येत नाही.
४. सर्व कौटुंबिक कार्यक्रमाना प्राधान्य देत, सहभागी होतो. माझ्यात झालेला बदल पाहून घरातले सर्वजण आनंदित झाले आहेत. माझ्या मित्रांना देखील माझ्यात बदल जाणवतो आहे.
५. व्यवसायात सुद्धा खूप फायदा झालेला आहे.
६. शिबिरानंतर सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढला आहे.
७. आत्मदर्शन ग्रुप हे माझे कुटुंबच झाले आहे.
शिबिरामुळे आयुष्यात नवचैतन्य आले आहे. आयुष्याची इंनिंग पुन्हा नव्याने सुरु झाली आहे.
धन्यवाद. ओम गुरुदेव.
ॐ गुरुदेव..
नाव :- मुकुंद प्रभाकर कापसे
व्यवसाय :- प्राथमिक शिक्षक
मी २७८ व्या आत्मदर्शन शिबिराचा साधक आहे.
शिबिराचे मला झालेले फायदे :-
१. मी हे शिबिर पूर्ण केल्यानंतर माझी दिनचर्या बदलून गेली.
२. दररोज मी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार वाजता उठतो.
३. गुरुजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे थंड पाण्याने अंघोळ व देवपूजा करतो.
४. त्यानंतर माझे दिवसभराचे नियोजन करतो.
५. माझा राग खूप कमी झाला आहे.
६. दिवसभर कितीही काम केलं तरी थकवा येत नाही.
७. नेहमी हसतमुख आणि प्रसन्न चेहरा यामुळे खूप आत्मविश्वास वाढलेला आहे.
८. मला सोरायसिसचा खूप त्रास होता. तो खूप कमी झाला.
९. नात्यामध्ये आपुलकी प्रेम वाढले आहे.
१०. मी, माझं, अहंकार नाहीसा झाला आहे.
ओम गुरुदेव...
मी सुरेखा कर्नाळे, सांगली, शिबिर क्रमांक - २७८
शिबिर सुरू केल्यापासून,
१. मी रोज योगा व प्राणायाम करते.
२. शिबिरामुळे सात्विक आहार घेण्याची सवय लागली.
३. शिबिरामुळे माझे पाच किलो वजन कमी झाले.
४. शिबिर सुरू केल्यापासून माझे पाय व पाठ दुखी कमी झाली.
५. शिबिर सुरू केल्यापासून प्रत्येक कामात उत्साह वाढला आहे.
६. योगा सुरू केल्यापासून पित्ताचा त्रासही कमी झाला.
७. शिबिरापासून रोज व्यायाम व प्राणायाम करण्याची सवय लागली आहे. व रोज सकाळी फिरण्याची सवय लागली आहे.
८. कौटुंबिक वातावरणात प्रसन्न वाटते.
९.आत्मदर्शन ग्रुप हे माझे कुटुंब झाले आहे.
शिबिरामुळे आयुष्यात चैतन्य निर्माण झाले आहे.
ओम गुरुदेव...
नाव- श्रीकांत साळुंखे, कोल्हापूर. व्यवसाय.
शिबीर क्रमांक २४३ पूर्ण केले.
शिबीर केल्या पासून,
१. खेळाची आवड निर्माण झाली. खूप दिवसांनी खेळ खेळला.
२. मांसाहार बंद केले. सात्विक भोजन घेऊ लागलो. वजन 85 kg होते ते 72 झाले.
३. नियमित व्यायाम व योगासने करू लागलो. पहाटे चार ते पाच ला उठायची सवय लागली.
४. मॅराथॉन स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम 10km, नंतर 21km, व त्यानंतर 50km पण पूर्ण केले.
५. 'हाफ -आयर्न मॅन' ही खडतर स्पर्धा पूर्ण केली. ऊर्जा प्रचंड वाढली.
हे सर्व गुरुजींच्या मुळे शक्य झाले.
ओम गुरुदेव..
नाव-अनिल फिरमे, गडमुडशिंगी, कोल्हापूर. व्यवसाय.
मी शिबिर क्रमांक २७७ पूर्ण केले.
१. मला लवकर उठण्याची सवय लागली.
२. माझा चहा बंद झाला.
३. घरात वातावरण मनमोकळे आहे.
४. शिबिरामुळे मला चांगला अनुभव आला.
ओम गुरुदेव ..
माझे नाव सौ. गीता धर्माधिकारी, सांगली मी आत्मदर्शन २७५ चे शिबीर पूर्ण केले.
शिबीरामुळे,
१. रोज पहाटे उठून योगा प्राणायाम करायची सवय झाली.
२. मला रात्री 2-3 पर्यंत झोप येत नव्हती. पायाचे स्नायू दुखायचे त्या मुळे चिडचिड होत होती.आता नाही. आता झोप पण नीट होते.
३. मी चहा खूप घेत होते आता पूर्णपणे बंद केला आहे.
४. माझी शुगर कंट्रोल मधे आली.
५. वजन 3 किलो कमी झालं. आता उत्साह वाढला आहे.
६. जेवण सात्विक आणि वेळेवर होते.
७. गुरूमुळे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक प्रगती झाली.
८. तेजापर्यंत गुरूजी घेऊन गेले.
ॐ गुरूदेव 🙏🙏
नांव:- प्रसाद श्रीकांत देशपांडे, सांगली. व्यवसाय:- वकील (Tax Consultant)
शिबीर क्रमांक:- २६०
अडचणीत असलेला मनुष्य धाव घेतो तो देवाकडे. मी ही काही वेगळा नाही. काही घरगुती कारणांमुळे मी मेंटली फार डिस्टर्ब होतो. तेव्हा देवाला वारंवार 'हे दुःख मलाच का?' विचारून हैराण करायचो. जसं सैरभैर झालेलं वासरू गाईचा हंबरडा ऐकून तिच्याजवळ जाते आणि एकदम शांत होते.तसेच माझे दुःख बघून जणू देव गुरुदेवांच्या रूपात माझ्या आयुष्यात आला.
आईमुळे अध्यात्माची आवड मला पहिल्यापासूनच लागली होती आणि ती वाढली गुरुदेवांमुळे. माझा कॉलेजचा मित्र मिलिंद कोष्टी याने मला "आत्मदर्शन" शिबिराचा मार्ग दाखवला. शिबिरामुळे गुरुदेव माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझे आयुष्यच बदलून टाकले.
शिबिर केल्यानंतर मी मेंटली खूप स्टेबल आणि शांत झालो. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आता कामही खूप आत्मविश्वासाने होते आणि नवीन काम घेण्याची भीती वाटत नाही. प्रत्येक कामाचे व्यवस्थित नियोजन करता येते आणि काम वेळेत पूर्णही होते. पूर्वीपेक्षा जास्त उत्साही वाटू लागले. कशाय आणि सात्विक आहारामुळे आरोग्यही सुधारले.
ओम गुरुदेव..
मी, वैशाली वसंत डफळापूरकर, सांगली. मी आत्मदर्शनाचे २६८ वे शिबीर केले आहे.
माझं वय आत्ता ७३पूर्ण आहे.
शिबिरात शिकविल्याप्रमाणे व्यायाम, आहार मी सध्या घेत आहे. याचा मला खूप फायदा झाला आहे.
गुढगे दुखी थांबली.
प्रत्येक दिवस उत्साहपूर्ण जातो.
माझ्या रागावरही बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे.
तरुण मुलामुलींनी, स्त्री पुरुषांनी पुढील आयुष्य आरोग्यदायी होण्यासाठी हे शिबीर अवश्य करावे असे मी सर्वांना सांगेन.
🙏 ओम् गुरुदेव 🙏
नाव - सौ. स्वरूपा दादासो पाटील, सांगली व्यवसाय - कलाशिक्षिका 🎨
शिबिर क्रमांक - २७८
२१ वर्षापूर्वी मी हे आत्मदर्शन शिबिर केलं होत तेव्हापासून आजपर्यंत गुरुजींनी दिलेल्या ज्ञानामृतावर प्रवास चालू आहे. वयाच्या ३० व्या वर्षी गुरुजींनी स्वतःकडे पाहण्याची कला वेगळ्या पद्धतीने शिबिरात दाखवून दिली व आत्मविश्वास वाढला.
फक्त गुरुजींनी दिलेल्या प्रेरणेमुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला व तोच टर्निंग पॉईंट ठरला. शून्यातून विश्व निर्माण केले time मानजमेंट ⏰ कसे करायचे ते गुरुजीं कडून शिकावे आणि हे फक्त आणि फक्त शिबिरामध्येच शक्य आहे. म्हणूनच पुन्हा एकदा २७८ व्या शिबिरामध्ये येण्याची संधी पुन्हा मिळाली आणि आम्ही ती गमावली नाही. परत आम्ही दोघांनी शिबिर जॉईन केले. आणि स्वतः ला remind केलेआणि त्याचा फायदा इथून पुढे होणारच आहे . योग🧎🏼♀️प्राणायाम व सात्विक 🍎🍇🍋🟩🍋🌽🥕🧅🥒🍅🫚🌿 आहाराची सवय यामुळे आमचे जीवन निरोगी व समृद्ध 🥰 होणारच आहे. यात शंका नाही. हे शीबीर म्हणजे कुटुंबच घरच 🏠 आहे.नवीन माणसे जोडली गेली. समोरील माणसांमध्ये देव 🙏🏽पाहाण्याची शिकवण गुरुजींनी दिली. त्याचा सर्व ठिकाणी नक्कीच फायदा होतो. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं तर ☕ चहा कायमचा सुटला व पित्ताचा त्रास गायब झाला. उत्साह दिवसभर टिकून राहतो कंटाळा येत नाही .
आमच्यासारखाच फायदा प्रत्येक माणसाला मिळू दे व त्यांना शिबिरात येण्याची सद्बुद्धी देवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.
कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता जे गुरुजींनी आम्हाला जे दिले ते आम्ही कधीच विसरणार नाही. ऋणी राहू.
याचं श्रेय फक्त आणि फक्त गुरुजींनाच..
🕉️ गुरुदेव🙏🏽🙏🏽💐
आशालता चव्हाण, वय ८०, सांगली.
माझा अनुभव खूपच छान आहे. माझे वय 80 आहे.
मी आत्मदर्शन शिबिर केल्यापासून,
१. अत्यंत कमी आहार घेते.
२. चहा बंद आहे.
३. व्यायाम व योगा यामुळे प्रकृती छान आहे.
४. कोणताही आजार विकार नाही. मन सतत आनंदी असते.
मला शिबिर खूपच आवडले. पुन्हा करता आले तर आनंदाने करीन.
ओम गुरुदेव 🕉️
मी सौ. मनिषा तुषार पोतदार , सांगली. २७५ शिबिर साधक
आत्मदर्शन नावाप्रमाणे मला स्वतःचे आत्मदर्शन झाले.. मी कोण आहे हे मला समजले.. खूप छान अनुभव आला... खरच धन्यवाद गुरुजी..
मला आलेले अनुभव
१. शिबिरापूर्वी मी खूप आळशी होते.. आता मी सर्व कामे वेळेत आणि अगदी मनापासून करते.
२. योग प्राणायाम ध्यान या सर्वांच महत्व समजले..
३. मी दररोज न चुकता योग प्राणायाम करते... आणि ४५ मिनिटे चालायला जाते.
४. माझा पूर्ण दिवस आनंदी राहतो... कंटाळा येत नाही.
५. बाहेरच खाणे पूर्ण बंद झालं.. घरीच वेळेवर सात्विक आहार घेते..
६. चिडचिड पूर्ण बंद झाली... शांत व समाधानी राहते.
७. घरी आनंदी वातावरण तयार झाले.
८. नेहमी उत्साही असते.
आयुष्यभर आम्ही हे शिबिर विसरू शकणार नाही.. असेच निरोगी राहून आनंदात जीवन जगू...
ओम गुरुदेव🕉️