पं. पू. श्री. संजीव कुलकर्णी गुरुजींचा जन्म ८ जून १९५१ रोजी पुण्यात झाला. कॉलेजमध्ये असताना हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल ह्या खेळामध्ये झोनल आणि इंटरझोनल स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला व बक्षिसे मिळवली.
सन १९७३ साली त्यांनी इंजिनियरींगची बी. ई. (सिव्हील) ही पदवी कराड इंजिनिअरिंग कॉलेज मधून घेतली. कोल्हापूर, बेळगांव, व पुणे या ३ ठिकाणी त्यांनी शून्यांतून व्यवसाय सुरू केला आणि वाढवला. प्रमोटर बिल्डर, क्रीडाईचे ते फाऊंडर प्रेसिडेंट आहेत. कोल्हापूर ज्युनियर चेम्बर्सचे अध्यक्ष असताना, कोल्हापूरात पहिल्यांदा इंडिविज्युअल डेव्हलपमेंट ओरिजिनेशन च्या २४ व्या नॅशनल कॉन्फरन्स चे आयोजन केले. बरीच वर्षे कोल्हापूर येथील रोटरी क्लब चे सदस्य होते व १९८६ साली रोटरी क्लब चे अध्यक्षपद भूषविले. १९८६ साली रोटरी डिस्ट्रिक्ट द्वारा गुरुजींना बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर अवॉर्ड देऊन सन्मानित केले.
स्वत:चा व्यवसाय व्यवस्थित चालू असताना त्याचा व्याप कमी करुन, वयाच्या ४६ व्या वर्षीच त्यांनी अध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचा ध्यास घेतला. हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत बऱ्याच आश्रमात राहून आश्रमातील सद्गुरुंद्रारा ज्ञान प्राप्त केले. उपनिषद, भगवद्गीता, संतांचे बाड:मय यांचा अभ्यास केला. आई-वडिलांची ईश्वरभक्ती, घरातील अध्यात्मिक वातावरण, घराण्याचे संस्कार मिळविलेले अध्यात्मिक ज्ञान गुरूपंरपरेतून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी आत्मदर्शन या संस्थेची स्थापना केली. वडिलांचे अध्यात्मिक गुरु भगवान रमणमहर्षी व आईचे अध्यात्मिक गुरु स्वामी स्वरुपानंद, पावस हे होते. त्यामुळे घरी नेहमी सत्संग होत असे.
आत्मदर्शन चे पहिले शिबीर १९९९ साली फेब्रुवारी महिन्यात झाले आणि तेव्हांपासून हा ज्ञानयज्ञ अविरत सुरू आहे. आज पर्यंत प्रत्येकी ११ दिवसांची २७९ शिबीरे संपन्न झाली आहेत. समाजाची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व अध्यात्मिक उन्नती व्हावी व तो ज्ञानी व्हावा ह्या उद्देशाने त्यांनी निःस्वार्थी हेतूने आत्मदर्शन शिबीरामार्फत हजारो साधकांना निसर्ग सानिध्यात प्रत्यक्ष ज्ञान व अनुभूती प्राप्ती करुन दिली.
आतापर्यत सांगली, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, बेळगांव या भागात ही शिबीरे संपन्न झाली आहेत तसेच ४० शिबीरे सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात झाली आहेत. गुरुजींना निसर्गभ्रमणाची फार आवड आहे. संपुर्ण भारत व परदेश दौर्यात श्रीलंका, युरोप, सिगांपूर, मलेशिया, नेपाळ, दुबई इत्यादी ठिकाणे फिरुन झाली आहेत.
आदर्श जीवन पध्दतीनुसार वैयक्तिक, कौटुंबिक, व्यवसायिक, सामाजिक आणि अध्यात्मिक अशा सर्व स्तरांवर यशस्वी जीवन जगणारे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. ह्या वयात देखील गुरुजींचा उत्साह भरभरुन ओसांडणारा व पहाण्यासारखा आहे. सदैव उत्साही आणि आनंदी रहाणारे गुरुजी आपणा सर्वांना आनंदी जीवन जगण्याची कला सहज साध्या आणि सोप्या भाषेत शिकवतात. त्यांची शिकवण जर साधकांनी आचरणात आणली तर काय घडू शकतं यांच ते स्वत:च उदाहरण आहेत.
प्रत्येक माणसाला चराचरातला देव ते दाखवून देतात. देवळातल्या देवाच्या दर्शना बरोबरच देह हेच देवाचे मन्दिर' आहे. हे 'पटवून देतात. त्यांच्या ह्या अध्यात्मिक आणि सर्वांगीण विकास कार्याची दखल घेऊन कोल्हापूरकरांनी त्यांना 'समाजरत्न' ह्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. पद्मजाराजे गर्ल्स हायस्कूलचे ते सध्यांचे सल्लागार आहेत. आत्तापर्यंत १२०० हून अधिक मुलींना योगा, प्राणायाम, ध्यान, आहार आणि आदर्श विचारपध्दतीने आचरण करण्यासाठी मार्गदर्शन करित आहेत.
गेल्या १० वर्षापासून दर गुरुवारी सायं. ६ ते रात्री ८ या वेळेत आत्मदर्शन मंदीर कोल्हापूरमध्ये गुरुजीद्वारे सत्संग आयोजित केले जाते. यामध्ये अनेक साधू, संत, सन्यांसी मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत ५४९ सत्संग आयोजित झाले आहेत.
भारतीय संस्कृतीची महानता भारताबरोबरच विश्वातील सर्वांपर्यंत ज्ञान व अनुभूतीद्वारा पोहचवून विश्वामध्ये शांती लाभावी यासाठीच हे महान कार्य सुरु आहे.